देवाधर्माला विरोध नाही

का हो, तुम्ही देवाच्या धर्माच्या का विरुद्ध आहात? अंधश्रद्धांच्या नावाखाली तुम्ही देवाविषयीची श्रद्धा व आमचा धर्मच उखडवायला निघाला आहात का?तुम्ही देवाविषयी श्रध्दा व आमचा ध्रर्मच उखडवायला निघाला आहात का? तुम्ही समाजातील देव, धर्म घालवून सारी अनीती माजवणार आहात का?

असे प्रश्न गेल्या २९ वर्षांपासून सातत्याने आम्हाला विचारले जात आहेत. कधी केवळ कुतूहलाने तर अनेकदा गर्भित धमकीसह, तर कधी व्यक्तिगत पातळीवर असे प्रश्न विचारले जातात, तर कधी धार्मिक संघटनांमार्फत विचारले जातात. प्रश्न कसाही विचारला जावो, अंधश्रद्धा निर्मूलन चळ्वळीशी या प्रश्नाचे एक अतुट नातं निर्माण झालंय एवढं मात्र खरं. याच एका पातळीवरुन हा प्रश्न विचारला जातोय असं नाही.

का हो, तुम्ही तर देव-धर्म यांना मुळीच हात लावत नाही. देवावर व धर्मावर कठोर हल्ला केल्याशिवाय समाजातील अंध्दश्रध्दा कशा दूर होणार? मुळ सोडून काय फांद्या झोडपत बसला आहात? या पध्दतीचे प्रश्न तर अधिकच कडवटपणे विचारले जातात. प्रामुख्याने पुरोगामी चळ्वळीत वावणारे लोक तर अक्षरशः आम्हाला आरोपीच्या पिंज-यात उभे करुनच अशा प्रश्नांचा भडीमार करतात. एवढंच नव्हे तर तुम्ही कसे बेअक्कल आहात, घाबरट आहात, तडजोडवादी आहात असं सांगण्याचाही यामागे अट्टाहास असतो.

खरं म्हणजे गेल्या २९ वर्षात या दोन्ही प्रकारच्या प्रश्नांना आम्ही समर्थपणे उत्तरे देत आलोय. एवढंच नव्हे तर महाराष्टाल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या लोणावळा येथील एका शिबिरात "देव व धर्म विषयक तब्बल अडीच दिवस प्रदीर्घ चर्चा झाली, वादावादी झाली आणि नंतर एकमतानं एक निर्णय घेण्यात आला.

"अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन चळ्वळ ही देवाच्या व धर्माच्या विरुध्द नाही. लोक ज्याला उघड अंधश्रध्दा समजतात त्या बाबा, बुवाबाजी, चमत्कार, नशीब, फलज्योतिष, भूत, भानामती, जादूटोणा, मंञतंत्र, अंगात येणं, आरोग्याविषयक गैरसमजूती याविरुध्द जनप्रबोधन करणं आणि देवाच्या, धर्माच्या नावावर सर्वसामान्य जनतेला लुबाडणार्‍या मधल्या दलालांविरुध्द उभं ठाकून त्यांचा भंडाफोड करणं हे आपलं प्रमुख उद्दिष्ट ही चळवळ मानते".

समाजामध्ये वैज्ञानिक द्रूष्टीकोन रुजवण्यास कटिबध्द असणाऱ्या चळवळीत ज्यांना अंधश्रध्दा दूर व्हाव्यात असं वाटतं, त्या सगळ्यांना अगदी देव व धर्म मानणार्‍यांना सुध्दा प्रवेश आहे. अगदी देव व धर्म न मानण्यांच्या बरोबरीच्या प्रतिष्टेनं त्यांचंही स्वागत आहे. देव व धर्म मानणार्‍यांना या चळवळीत समान प्रतिष्ठा आहे. याचा अर्थ या चळवळीत समान प्रतिष्ठा आहे. याचा अर्थ या चळ ळीच्या मंचावरुन देव आणि धर्माचा प्रसार करण्यांच स्वातंञ्य आहे,असा कुणी घेऊ नये.अर्थात देव व ध्रर्म या विषयावर संघटनांतर्गत व बाह्य व्यासपीठावर या विषयावर आपापली मते मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार राहील.देव व ध्रर्म न मानणार्‍यांनाही राहील.देव व धर्म न मानणार्‍यांना आपली मते जेवढया ताकदीने मांढण्याची मुभा राहील.तेवढीच संधी देव व धर्म मानणार्‍यांनाही राहील.पण,ही मते व्यक्तिगत समजली जातील.ती संघटनेची अधिकृत मते मानली जाणार नाहीत,असा एक्मुखी निर्णय संघटनेनं घेतला आहे.गेल्या २९ वर्षापासुन याच धोरणांन चळवळींच काम सुरु आहे. यात काही नवं नसलं तरी अधिकृतपणे ही संघटनेची भूमिका आहे. कारण या चळ्वळीत अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते देव न मानणारे आहेत.ध्रर्माची उघडपणे चिकित्सा करणारे आहेत.त्या सर्वानीं ही भूमिका स्वीकारणे म्हणजे आजवर मांडत आलेल्या आपल्याच म्हणण्याला मूरड घालणे होय,असं वाटणं स्वाभाविकही होत.तरी पण त्यांनी अंधश्रध्दा निर्मुलन चळ्वळ हे एक व्यासपीठ आहे ,हे लक्षात घेऊन ही भूमिका स्वीकारली आहे.

येथे वारंवार "भूमिका" हा शब्द वापरत आहे.कारण वरील निर्णय हा स्ट्रॅटेजी अथवा सोईजी तडजोड नाही तर एक स्वतंञ विचार आहे ,हा मुद्दा व्यवस्थितरित्या समजावून घेतला पाहीजे.

"देव व धर्म विषयक ही केवळ स्ट्रॅटेजी असती तर यांचा अर्थ असा झाला असता की ,मुळात संघटना देव व धर्माच्या विरुध्द आहे ,या समाजात देव व धर्म राहता कामा नये असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं पण सध्या असं सांगण्यात धोका आहे.म्हणून आम्ही हा मुद्दा मांडत नाही, त्याविषयी मूग गिळून राह्तो. पुढे सवड मिळताच आम्ही धर्म व देव यावर कडाडून ह्ल्ला करु" असं मत आमचं नाही.म्हणूनच ही स्ट्रॅटेजी नाही.केवळ चळवळ वाढीसाठी स्वीकारलेली सौयीची तडजोडी नाही.मग अशी भूमिका संघटनेने का स्वीकारली?आमचं मुख्य उद्दिष्ट समाजातल्या अंध्यश्रध्दा दूर करावयाच्या तो धर्म मानणारा आहे,एवढच नव्हे तर हे दोन्ही मुद्दे त्याच्या द्ष्टीने अगदी प्रामाप्रिय आहेत.ते सर्वसामान्य माणसाच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग बनले आहेत

देव व धर्म मानणार्‍या व अगदी घट्ट कवटाळणा-या समाजाच्या अंधश्रध्दा दूर करावयाच्या असतील तर आपल्या देव व धर्म विषयक कल्पनांना धक्का लागणार नाही,असा विश्वास त्याला वाटला तरच तो अंधश्रध्दा म्हणजे काय ते समजून घेण्यासाठी आपण आधी अंधश्रध्दा व देव,धर्माचं नातं तपासून पाहू.

अनेक पुरोगामी विचार करणा-यांना -यांच्या अभ्यासाआभ्यांसाआधारे प्रामाणिकपणे वाटतं की देव व धर्म ही कल्पनाच अंधश्रध्दा टिकून आहेत.देव व धर्म ही कल्पनाच अंधश्रध्दाचं खरं मूळ आहे.हे खरं आहे का?
क्रमशहाः......

aaaa