फलज्योतिष किती दिवस धर्माआड दडून बसणार?

फलज्योतिष हे शास्त्र नाही. आजच्या विज्ञानाने नाकारलेला तो एक चोथा आहे .१९२ वैज्ञानिकांनी, ज्यात १२ नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी हे केवळ ज्योतिषांचा पोट भरण्याचा धंदा आहे, त्याला कोणतीही वैज्ञानिक पार्श्वभूमी नाही असे म्हटले आहे. स्वातंत्र्यावीर सावरकरांनी फलज्योतिषाची खिल्ली उडवली आहे.
म्हणूनच आम्ही फलज्योतिष हे शास्त्र आहे हे शास्त्रीय कसोटीवर सिध्द करा असे ११ लाख रुपयांचे जाहीर आव्हान देतो. पण अखिल भारतीय ज्योतिष महामंडळासारख्या संस्था मात्र या आरोपांना फोल ठरवील असे पुरावे सादर न करता अथवा आव्हान स्वीकारुन आपली शास्त्रीयता सिध्द न करता \'फलज्योतिष हा वेदाचा भाग आहे. हिंदुधर्माचा अविभाज्य भाग आहे\' असा दावा पुढे करुन सातत्याने जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न करतात. एवढेच नव्हे तर जेव्हा जेव्हा संघर्षाची भूमिका येते, तेव्हा तेव्हा ते ज्योतिषी हिंदुत्ववादी संघटना आमच्या पाठीशी असल्याची धमकी देतात.

केवळ वेदांचा अथवा हिंदुधर्माचा भाग आहे म्हणून आम्हाला सामान्य हिंदू जनतेला लुबाडण्याचा परवाना मिळाला आहे, असा दावा.
त्यासाठी त्यांनी शास्त्रीय उत्तरे व समर्थन दिले पाहिजे. स्त्रियांना शिक्षणाचा मुळीच अधिकार नसलेला हिंदू धर्म आज कुणी मान्य करतो काय? मग केवळ हिंदू धर्माचा भाग आहे म्हणून फलज्योति जीवंत राहता येईल काय? त्यांच्या व्यवसायाला सत्याचा भक्कम आधार आहे?

त्याच्या विषयाला शास्त्रिय पाया आहे हे सिध्द करण्यासाठी त्यांनी पुढे आले पाहीजे. जोवर ज्योतिष महामंडळ आपल्या विषयाची शास्त्रियता सिध्द करीत नाही, तोवर हिंदुत्ववादी संघटनांनीही तटस्थेची भूमिका घेतली पाहीजे .अन्यथा आपल्याच धर्माच्या लोकांवे शोषण करु देण्यास हातभार लावल्याचा ठपका त्यांच्यावर येईल आणि हिंदुत्ववादी संघटनांच्याच सचोटीबद्दल सामान्य जनतेत संभ्रम निर्माण होईल .खरं म्हणजे आम्हाला कल्पना आहे की सामान्य हिंदू जनतेचे शोषण होणे हिंदुत्ववादी संघटनांनाही मान्य होण्यासारखे नाही. जेव्हा आम्ही सत्य परिस्थिती संबंधित नेत्यांच्या ल्क्षात आणून दिली, तेव्हा त्यांनी असल्या शोषण करणा-या दलालामागचा पाठिंबा काढून घेतला. यांपुढेही ते तशीच भूमिका घेत राहतील ही अपेक्षा. ! आपणापैकी अनेकांना आमचे विचार पटतील. या कार्यात सहभागी व्हावेसे वाटेल. आपण अवश्य या. ! सहकार्य करा. ! आपल्या सगळ्यांचे स्वागतच आहे.

aaaa